Latest Posts

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात नेताजींचा मोलाचा वाटा : माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम

– मुलचेरा येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / मुलचेरा (Mulchera) : स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी देशाला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली असून नेताजींचा स्वातंत्र्य चळवळीत मोलाचा वाटा असल्याचे प्रतिपादन माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनी केले. मुलचेरा येथे सुभाषचंद्र बोस यांची १२७ जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून तहसीलदार चेतन पाटील, विशेष अतिथी म्हणून वैद्यकीय अधीक्षक डॉ. कुकुडकर, ठेकेदार अशोक भापकर, पोलीस उपनिरीक्षक संदीप साखरे, प्रमुख पाहुणे म्हणून विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष सीतारामजी सोनानिया, जिल्हा अभियान प्रमुख सदाशिव माकडे, माजी बांधकाम सभापती युधिष्ठिर बिश्वास, सरपंच भावना मिस्त्री, माजी प.स. सभापती सुवर्णा येमुलवार, माजी सरपंच ममता बिश्वास, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश दत्ता, भाजप जिल्हा सचिव सुभाष गणपती, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष बादल शहा, भाजपचे तालुका अध्यक्ष संजीव सरकार, उपाध्यक्ष स्वरूप पोतदार, शिवसेना तालुका प्रमुख (शिंदे गट) गौरव बाला, राकॉचे शहर अध्यक्ष मनोज कर्मकार,भाजपचे तालुका महामंत्री निखिल हलदार, विष्णू रॉय, जेष्ठ नागरिक गणपत मडावी, मंटू सरकार, कृष्णा हलदार, संतोष कर्मकार, प्राचार्य लतीफ शेख, प्राचार्य डी.डी. रॉय आदी मान्यवर तसेच विविध शाळांनी विध्यार्थी उपस्थित होते.

पुढे बोलताना थोर स्वातंत्र्य सैनिक नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आपले आयुष्य देशासाठी वेचले. नेताजी खूप शिकलेले होते. मात्र त्यांनी कधीही स्वार्थाचा विचार केला नाही. त्यांचा प्रत्येक निर्णय, प्रत्येक पाऊल हे देशाच्या विकासाच्या आणि स्वातंत्र्याच्या दृष्टीने पडले होते. त्याच्या स्मरणार्थ कृतज्ञता म्हणून हा दिवस दरवर्षी पराक्रम दिवस म्हणून साजरा केला जातो आहे. असे भाग्यश्री आत्राम यांनी म्हटले. तहसीलदार चेतन पाटील यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावर प्रकाश टाकत मार्गदर्शन केले.

दरम्यान मान्यवरांच्या हस्ते मुख्य चौकात सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कमिटी तर्फे मान्यवरांचे शॉल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तर उत्कृष्ठ भाषण दिलेल्या शालेय विद्यार्थ्यांचा व काही शिक्षकांचा देखील शॉल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निखिल हलदार यांनी तर आभार शिक्षक डे यांनी मानले. कार्यक्रम आटोपताच महाप्रसाद वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वांनी सहकार्य केले.

Latest Posts

Don't Miss