Latest Posts

ईव्हीएम विरोधात चंद्रपुरात वकिलांचा मूकमोर्चा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrapur) : संविधानाने मतदारांना दिलेल्या बहुमूल्य मताचा योग्य वापर व्हावा तसेच लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका निष्पक्षपणे व पारदर्शकरित्या पार पडाव्या, यासाठी ईव्हीएम मशीन बंद करण्यात यावी व सर्व निवडणूक प्रक्रिया बॅलेट पेपरने घेण्यात यावी, या मागणीसाठी वकीलातर्फे सोमवारी चंद्रपुरात मूकमोर्चा काढण्यात आला.

मोर्चा न्यायालय प्रवेशद्वारापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फ महामहीम राष्ट्रपती तसेच केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्तांना निवेदन देण्यात आले. मूकमोर्चाचे आयोजन ऍड. दत्ता हजारे, ऍड. भिमराव रामटेके, ऍड. पुनम वाकडे, ऍड. झेड. के. खान, ऍड. पी. एम. आवारी, ऍड. शरद आंबटकर, ऍड. जयंत साळवे, ऍड. वैशाली टोंगे, ऍड .फरहान बेग, ऍड. शंकर सागोरे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले होते. मोर्चात बहूसंख्य वकिलांनी सहभाग घेतला होता.

Latest Posts

Don't Miss