Latest Posts

पोलीस स्टेशन गट्टा जांबिया येथे जनजागरण मेळावा संपन्न 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / चामोर्शी (Chamorshi) : CRPF १९१ बटालियन/ E कंपनी यांच्या वतीने पोलिस स्टेशन गट्टा जांबिया येथे काल ३० जानेवारी २०२४ रोजी भव्य जनजागरण मेळावा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी १९१ बटालियन/E कंपनी चे असिस्टंट कमांडंट मोहित कुमार साहेब होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून १९१ बटालियन चे 2 IC अलोक अवस्थी होते. तसेच सदर कार्यक्रमास प्रभारी अधिकारी चेतन परदेशी, PSI जावळे, PSI घावटे, PSI शिंदे, गट्टा गावचे उपसरपंच महारु लेकामी, PHC चे वैद्यकीय अधिकारी डॉ. वड्डे, गट्टा आश्रमशाळेचे मुख्याध्यापक मारटकर तसेच इतर आजूबाजूचे गावचे गाव पाटील हजर होते.

कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीविर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीपप्रज्वलन करून करण्यात आले. मेळाव्या दरम्यान AC मोहीत कुमार साहेब यांनी गावकऱ्यांना तसेच शाळेच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या Civic action program che महत्त्व सांगितले. तसेच नक्षल दबावाला बळी न पडता आपले जीवनमान सुधारणे बाबत आदिवासी बांधवांना मोलाचे मार्गदर्शन केले. प्रभारी अधिकारी चेतन परदेशी यांनी पोलिस दादालोरा खिडकी अंतर्गत येणाऱ्या विविध कल्याणकारी योजना व प्रशिक्षणाबाबत माहिती देवून मार्गदर्शन केले. तसेच वांगेतुरी व गर्देवाडा पोलिस स्टेशन निर्माण झाल्याने नागरिकांना सरकारी सोईसुविधा लवकर उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच रस्ते, मोबाईल टॉवर, पुल, यांच्या बांधकामास विरोध न करता आता विकासाच्या प्रवाहात येण्याचे नागरिकांना आव्हान केले.

सदर मेळाव्यास, गट्टा, जम्बिया, जाजवांडी, वाळवी शाळेतील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट असे सांस्कृतिक डान्स कार्यक्रम केले.

मेळाव्या दरम्यान उपस्थित गावातील विद्यार्थी व नागरिकांना १) सोलर लाईट- २, २) शिलाई मशीन- २०, ३) ब्लँकेट- २००, ४) व्हॉलिबॉल व नेट- ३१, ५) कॅरम- ९, ६) क्रिकेट किट- ८ इ. साहित्यांचे वाटप करण्यात आले.

तसेच सदर मेळावामध्येच प्राथमिक आरोग्य केंद्र गट्टा मार्फत health camp चे आयोजन करण्यात आले होते. उपस्थित नागरिकांची BP, sugar इत्यादी तपासणी करणेत आली. तसेच १३ लोकांचे आयुष्मान भारत कार्ड काढण्यात आले.

सदर जनजागरण मेळावाकरिता जवळपास ३५० नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते. उपस्थित नागरीक व विद्यार्थ्याना जेवण व पाण्याची व्यवस्था करुन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. सदर कार्यक्रमासाठी सीआरपीएफ, जिल्हा पोलिस, एसआरपीएफ चे अधिकारी- अमलदार यांनी परिश्रम घेतले.

Latest Posts

Don't Miss