Latest Posts

कांकेरमध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक : ३ माओवादी ठार तर २ हत्यारे सुरक्षा दलांच्या हाती 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / रायपूर (Raipur) : छत्तीसगडमधील कांकेर येथे सुरक्षा दलाचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये भीषण चकमक झाली आहे. या चकमकीमध्ये ३ नक्षलवादी ठार तसेच दोन हत्यारेही सुरक्षा दलांच्या हाती लागले आहेत.

वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पोलीस आणि डीआरजीच्या पथकाने शोधमोहीम चालवली होती. कोयलीबेडाच्या दक्षिण भागामध्ये ही चकमक झाली. आताही जंगलांमध्ये शोधमोहीम सुरू आहे.

कांकेरचे एसपी आय.के. एलेसेला यांनी या चकमकीच्या घटनेला दुजोरा दिला. जिल्हा राखीव गार्ड आणि सीमा सुरक्षा दलाच्या नेतृत्वाखाली नक्षलविरोधी मोहिमेदरम्यान कोयालीबेडा येथील जंगल परिसरात ही चकमक झाली.

Latest Posts

Don't Miss