Latest Posts

सैन्य दलामध्ये अधिकारी पदासाठी मोफत पूर्व प्रशिक्षणाचे आयोजन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा (Wardha): भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलातील अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्विस सिलेक्शन बोर्ड या परीक्षेची पुर्व तयारी करुन घेण्यासाठी भरतीपुर्व मोफत प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी पात्र उमेदवारांनी २८ ऑक्टोंबर ला  मुलाखतीस उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी श्रीपती मोरे यांनी केले आहे.

सदर प्रशिक्षण छात्रपुर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड नाशिक येथे शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतीसाठी २ ते ११ ऑक्टोंबर या कालावधीत एसएसबी कोर्स क्र.५९ आयोजित करण्यात आले आहे. प्रशिक्षण निवासी असून भोजन व प्रशिक्षण नि:शुल्क असणार आहे. प्रशिक्षणास सहभाग नोंदविण्यासाठी मुलाखतीस येतांना सैनिक कल्याण विभाग पुणे यांच्या www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर एसएसबी-५९ कोर्ससाठी प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन व ते पूर्ण भरुन सोबत घेऊन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय वर्धा येथे २८ ऑक्टोंबर रोजी मुलाखतीस उपस्थित राहावे.

प्रशिक्षण केंद्रात एसएसबी कोर्ससाठी प्रवेश प्राप्त करण्याकरीता उमेदवार कंबाईंड डिफेंस सर्विसेस एक्झामिनेशन अथवा नॅशनल डिफेंस अकॅडमी एक्झामिनेशन पास झालेला असावा. व त्यासाठी सर्विसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र असावे, एनसीसी (सी) ए किंवा बी ग्रेड मध्ये पास झालेला असावा व एनसीसी ग्रुप हेडक्वॉर्टरने एसएसबीसाठी शिफारस केलेली असावी.  टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एसएसबी मुलाखतीसाठी कॉल सेंटर लेटर असावे. युनिर्व्हसिटी एन्ट्री स्किमसाठी एसएसबी कॉल सेंटर आलेले असावे. अथवा एसएसबीसाठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे.

अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपुर्व प्रशिक्षण केंद्र नाशिक यांच्या ०२५३-२४५१०३२ या दुरध्वनी क्रमांकावर किंवा ९१५६०७३३०६ या व्हॉट्ॲप क्रमांकावर किंवा जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या zswo_wardha@maharashtra.gov.in या ईमेल वर किंवा ०७१५२-२४८९५५ या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे जिल्हा सैनिक कल्याण विभागाच्यावतीने कळविले आहे.

 

Latest Posts

Don't Miss