Latest Posts

नरेश कनोजिया यांना महाराष्ट्र शासनाकडून देण्यात येणारा गुणवंत अधिकारी पुरस्कार प्रधान

– सन २०२०-२१ चे ठरले गुणवंत अधिकारी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर (Nagpur) : जिल्हा परिषद गडचिरोली येथे आरोग्य विभागामध्ये प्रशासकीय अधिकारी तथा सहायक प्रशासन अधिकारी म्हणून कार्यरत असलेले नरेश मोहनलाल कनोजिया यांना ग्रामविकास व पंचायत राज विभाग कडून देण्यात येणारा गुणवंत अधिकारी पुरस्कार सन २०२०-२१ चा ५ फेब्रुवारी २०२४ रोजी वसंतराव नाईक, राज्य व्यवस्थापन कृषी व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (वनामती) नागपूर येथे आयुक्त विभाग नागपूर विजयालक्ष्मी बिदरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

नरेश कनोजिया हे सामान्य प्रशासन विभागामध्ये कार्यरत असताना त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन शासनाकडून त्यांना सदर पुरस्कार जाहीर होऊन आज त्याचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

त्यांनी आपल्या २८ वर्षाच्या सतत सफल यशाचे श्रेय जिल्हा परिषद गडचिरोलीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंग, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर शेलार, जिल्हा आरोग्य अधिकारी दावल साळवे व सर्व खाते प्रमुख तसेच इतर आपले समवेत कार्य करणारे सर्व अधिकारी व सहकारी कर्मचाऱ्यांना तसेच आपल्या कुटुंबीयांना दिलेले आहे. याप्रसंगी त्यांनी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद व उप मुख्य कार्यकारी अधिकारी फरेन्द्र आर. कुतिरकर यांच्या मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

गुणवंत अधिकारी आपल्या मते कसा असावा असा प्रश्न केला असता त्यांनी म्हटले की, गुणवंत अधिकारी हा आपल्या सहकारी अधिकारी कर्मचाऱ्यांना समजून घेणारा असावा त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्या दूर करणारा असावा. आपल्या सहकाऱ्यांना आवश्यक असणारी साधनसामुग्री त्यांना पुरवणे ही त्या अधिकाऱ्याचे कर्तव्य आहे, असे त्याने मानावे. कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन प्रकरणे कशी निकाली काढता येतील तसेच कर्मचाऱ्यांमध्ये असलेले कलागुण ओळखून प्रशासनात त्याचा उपयोग करता येणे.

Latest Posts

Don't Miss