Latest Posts

इंदाळा येथे टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : इंदाळा येथे निसर्ग युवा क्रिकेट क्लब यांच्या तर्फे टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

यावेळी ग्रा.पं. सदस्या नवेगाव डॉ. दीप्ती अभिजित कोरडे (माटे) यांच्या हस्ते स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले.

या स्पर्धेच्या उद्घाटना प्रसंगी चिमुर-गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते, भाजपा जिल्हा अध्यक्ष प्रशांत वाघरे, युवा उद्योजक महान ठाकरे, माजी जि.प. अध्यक्ष समय्याजी पसुला, अभिजित कोरडे, सरपंच इंदाळा मनोज जेंगठे, सरपंच पारडी संजय निखारे, सरपंच कनेरी तुषार मडावी, रोहनपाटील जक्कनवार, मनोहर दुधाबावरे कोटगल, व निसर्ग युवा क्रिकेट क्लब चे सर्व पदाधिकारी खेळाडू गावातील युवा-युवक तसेच गावातील नागरिक बहु संखेने उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss