Latest Posts

गडचिरोली : ६ लाखांचे बक्षिस असलेल्या जहाल नक्षलीस अटक 

– महाराष्ट्र शासनाने जाहिर केले होते ०६ लाख रुपयांचे बक्षिस 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : फेब्राुवारी ते माहे मे दरम्यान माओवादी टीसीओसी कालावधी साजरा करतात. या दरम्यान ते सरकारी मालमत्तेचे नुकासान करणे, सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला करणे व इतर प्रकारच्या सरकारी कामात अडथळे आणून जाळपोळ करणे इ. देशविघातक कृत्य करत असतात. याच टीसीओसी कालावधीच्या पाश्र्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलाने सुरक्षा दलांविरुद्धच्या अनेक हिंसक घटनांमध्ये सक्रिय सहभाग असलेल्या एका जहाल महिला माओवाद्यास काल २५ फेब्रुवारी २०२४ रोजी अटक केले.
काल २५ फेब्रुवारी २०२४ रोजी मागील वर्षी माहे एप्रिल २०२३ मध्ये मौजा केडमारा जंगल परिसरात झालेल्या पोलीस माओवादी चकमकीच्या अनुषंगाने पोस्टे भामरागड येथे दाखल अप. क्र. ३७/२०२३ कलम ३०७, ३५३, १४३, १४७, १४८, १२०(ब) भादवि. सहकलम ३/२५, ५/२८, ८/२७ भाहका, ३, ४ भास्फोका, १३, १६, १८ (अ), २० बे. कृ. प्र. अधिनियम मधील आरोपीे जहाल महिला माओवादी राजेश्वरी ऊर्फ कमला पाडगा गोटा (३०) वर्षे, रा. बडा काकलेर, तह. भोपालपट्टनम, जि. बीजापूर (छ.ग.) हिला गडचिरोली पोलीस दलाने विशेष अभियान राबवून अटक केली.
अधिक तपासात असे दिसून आले की, ३० एप्रिल २०२३ रोजी मौजा केडमारा येथे झालेल्या चकमकीमध्ये तिचा प्रत्यक्ष सहभाग होता ज्यामध्ये ०३ माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आले होते. तसेच पोस्टे तोयनार जि. बीजापूर (छ.ग.) येथील कचलाराम जंगल परिसरात झालेल्या चकमकीमध्ये तिचा प्रत्यक्ष सहभाग असून तिला सदर चकमकीच्या अनुषंगाने दाखल पोस्टे तोयनार येथे दाखल अप. क्र. ०५/२०१८ कलम ३०७, १४७, १४८, १४९, भादंवि. सहकलम २५, २७ भाहका मध्ये सन २०१९ मध्ये अटक करण्यात आली होती.
– अटक जहाल महिला माओवाद्याबाबत माहिती
राजेश्वरी ऊर्फ कमला पाडगा गोटा
– दलममधील कार्यकाळ
२००६ साली चेतना नाट्यमंचामध्ये सदस्य या पदावर भरती होऊन माओवादी चळवळीत सक्रीय झाली.
२०१० -११ साली चेतना नाट्यमंचामध्ये उप-कमांडर या पदावर पदोन्नती झाली.
२०१६ साली फरसेगड दलममध्ये बदली होऊन सन २०१९ पर्यंत सदस्य पदावर कार्यरत होती.
२०१९ साली पोस्टे तोयनार जि. बीजापूर (छ.ग.) च्या जंगल परिसरात पोलीस पार्टीसोबत झालेल्या चकमकीच्या अनुषंगाने दाखल गुन्ह्यात तिला अटक करण्यात आली होती.
सन २०२० मध्ये कारागृहातुन सुटका झाल्यानंतर आतापर्यंत टेलर टीम दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटी अंतर्गत एसीएम (एरीया कमिटी मेंबर) पदावर कार्यरत होती.
– कार्यकाळात केलेले गुन्हे
चकमक : ०४
२०१६ मध्ये मौजा कर्रेमर्का, फरसेगड (छ.ग.) जंगल परिसरात पोलीसांसोबत झालेल्या चकमकीमध्ये सहभाग.
२०१६ मध्ये मौजा मरेवाडा, भोपालपट्टनम (छ.ग.) जंगल परिसरात पोलीसांसोबत झालेल्या चकमकीमध्ये सहभाग.
२०१८ मध्ये मौजा कचलाराम, बीजापूर (छ.ग.) जंगल परिसरात पोलीसांसोबत झालेल्या चकमकीमध्ये सहभाग.
सन २०२३ मध्ये मौजा केडमारा, (भामरागड, जि. गडचिरोली) जंगल परिसरात गडचिरोली पोलीसांसोबत झालेल्या चकमकीमध्ये सहभाग.
महाराष्ट्र शासनाने राजेश्वरी ऊर्फ कमला पाडगा गोटा हिच्या अटकेवर ६ लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.
गडचिरोली पोलीस दलाच्या प्रभावी कारवाईमुळे माहे जानेवारी २०२२ ते आतापर्यंत एकुण ७३ माओवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आलेले आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता , अपर पोलीस अधीक्षक, अहेरी एम. रमेश यांचे मार्गदर्शनाखाली पार पडली. तसेच पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी माओवाद्यांना माओवादाची हिंसक वाट सोडुन आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे.

Latest Posts

Don't Miss