विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / मुलचेरा (Mulchera) : तालुक्यातील कोठारी येथे जानेवारी ३ तारीखेला येथील युवक प्रवीण सन्याशी कडते हे वाघाच्या हल्यात गंभीर पणे जखमी झाले. आज आविसं काँग्रेस नेते व माजी जि.प. अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांनी मुलचेरा तालुक्यात दौऱ्यावर असतांना तेथील कार्यकर्त्यांकडून माहिती मिळताच कोठारी येथील प्रवीण कडते यांच्या घरी भेट घेऊन आस्तेने विचारपूस केले. त्यावेळी कडते नातेवाईकांनी औषध उपचारासाठी पैशाची अडचण भासत आहे. म्हणून सांगितले असता माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी त्या युवकांला पुढील औषध उपचारासाठी आर्थिक मदत केली.
यावेळी जिल्हाध्यक्ष आदिवासी आघाडी कांग्रेस पार्टी गडचिरोली तथा सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक हनमंतू मडावी, कालिदास कुसनाके ग्रा.पं. सदस्य, कु. रोशनी कुसनाके, प्रतिमा कडते ग्रा.प. सदस्य, माणिकराव सेडमाके अशोक येलमुले, तंटामुक्ती समिती अध्यक्ष व्यंकटेश धानोरकर, राजेश दुर्गे, ग्रा.पं. सदस्य, प्रदीप मडावी, सुरेश सिडाम, बंडू मडावी, प्रमोद गोडसेलवार, राकेश आल्लुरवार, कार्तिक डोके, सतीश निखाडे, रोहित कडते, माया कडते, गौरु सेडमाके, सुमन कळतेसह परिसरातील आविसं काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक- कडते कुटुंबातील नातेवाईक उपस्थित होते.
