– जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / एटापल्ली (Etapalli) : भारतीय जनता पार्टी तालुका एटापल्ली अंतर्गत माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्र्बिशराव आत्राम यांच्या नेतृत्वात आणि जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांच्या मार्गदर्शनाखाली जांबिया गट्टा गिलनगुडा, गट्टागुडा, या गावात जाऊन जनसंवाद यात्रा घर चलो अभियानाअंतर्गत मोदी सरकारच्या योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवून त्यांना लाभ मिळावा याकरिता भारतीय जनता पार्टी तालुका एटापल्ली अंतर्गत
कमळ चिन्ह वॉल पेंटींग काढून फिर एक बार मोदी सरकार लिहून गाव चलो अभियान राबविण्यात आले.
यावेळी एटापल्ली तालुकाध्यक्ष प्रशांत आत्राम, तालुका महामंत्री मोहन नामेवार, तालुका उपाध्यक्ष रैनैद्र येमला, अध्यक्ष आदिवासी आघाडी सम्मा जेट्टी, तालुका उपाध्यक्ष सुरेश आतलामी रा जांबिया, बुथ पालक साईनाथ वड्डे, ग्रामपंचायत सदस्या सौ. मिरा आतलामी, मंगेश नव्हडी, बुथ अध्यक्ष विकास देवनाथ रा गट्टा, व भाजप कार्यकर्ते सहकार्य केले व इतरही कार्यकर्ते उपस्थित होते.
