Latest Posts

नागरिकांना उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र व शपथपत्र पाहण्याची सुविधा : नोटीस बोर्ड व ऑनलाइन पाहण्याची सोय उपलब्ध

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा (Bhandara) : भंडारा जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदार संघ ६० तुमसर, ६१ भंडारा व ६२ साकोली या तीनही मतदार संघात उमेदवारांकडून दाखल करण्यात येणारे नामनिर्देशन पत्र व त्यासोबतचे शपथपत्र नमुना – २६, नागरिकांना  ऑनलाईनसुध्दा पाहता येणार आहे.

उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र व शपथपत्र नमुना – २६, नागरिकांच्या अवलोकनार्थ   भारत निवडणुक आयोगाच्या https://affidavit.eci.gov.in या संकेतस्थळावर सुध्दा शपथपत्र नमुना-२६ अपलोड करण्यात येणार असल्यामुळे या संकेतस्थळावर देखील नागरिकांना शपथपत्र नमुना- २६ पाहता येईल.

विधानसभेसाठी होणाऱ्या निवडणुकीकरीता नामनिर्देशन पत्रे २२ ऑक्टोबर ते २९ ऑक्टोबर २०२४ पर्यंत सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या  कक्षामध्ये दाखल करता येतील. नामनिर्देशन पत्रे वरील ठिकाणी कार्यालयीन वेळेत मिळू शकतील. नामनिर्देशन पत्राची छाननी ३०ऑक्टोबर २०२४ ला होणार आहे.

ज्या उमेदवारांना उमेदवारी मागे घ्यावयाची असेल त्यांचे अर्ज  ४ नोव्हेंबर २०२४ परत घेता येतील. २० नोव्हेंबर रोजी मतदान असून २३ नोव्हेंबर ला निकाल जाहीर होणार आहेत.

Latest Posts

Don't Miss