Latest Posts

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस जन्मठेपेची शिक्षा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrapur) : पोलीस स्टेशन मुल हद्दीतील एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ०६ ऑगस्ट २०२१ रोजी जबरीने लैंगीक अत्याचार केला. यातील आरोपी विरुध्द ०९ ऑगस्ट २०२१ रोजी २४ वर्षीय आरोपी विरुध्द पोलीस स्टेशन मुल येथे अपराध कमांक ३८४/२०२१ कलम ३७६ (२) (एन), ३७६ (३), ५०६ भादवी सहकलम ४, ६ लैंगीक गुन्हयापासुन बालकांचे संरक्षण कायदा २०१२ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला.

गुन्हयाचा तपास पोउपनी राजश्री रामटेके यांनी करून आरोपी विरुध्द दोषारोपत्र न्यायालयात सादर केले. आज १७ फेब्रुवारी २०२४ रोजी कोर्ट विद्यमान अनुराग दिक्षीत विशेष सत्र न्यायाधिश चंद्रपूर यांचे कोर्टात आरोपी मार्गेश्वर किशोर मेश्राम (२३) यास जन्मठेप व ५ हजार रू. दंड, दंड न भरल्यास १२ महीने कारावास अशी शिक्षा सुनावण्यात आली.

सदर गुन्हयात आरोपीस शिक्षा ठोठावण्यास सरकारतर्फे सहा. सरकारी अभियोक्ता देवेंद्र महाजन तसेब कोर्ट पैरवी अधीकारी म्हणून महिला पोलीस परवीन पठाण ब.न. ८३ पोस्टे मुल यांनी कामगीरी बजावली.

Latest Posts

Don't Miss