विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : उपविभागीय अधिकारी कार्यालय, कुरखेडा ता. कुरखेडा जिल्हा गडचिरोली येथील अव्वल कारकुन नागसेन प्रेमदास वैद्य (४६), (वर्ग-३) यांना १३ हजार रुपयांची लाच रक्कम स्विकारतांना ॲन्टी करप्शन ब्यूरो, गडचिरोलीच्या पथकाने ५ फेब्रुवारीला रंगेहाथ पकडले.
माहितीनुसार, तकारदार यांस आदिवास ते आदिवासी ला जमीन विक्री करण्याचे परवानगीचे आदेश तयार करून दिल्याचा मोबदला म्हणुन आरोपी नागसेन प्रेमदास वैद्य यांनी रूपये १५ हजार लाच रक्कमेची मागणी केली. तक्रारदार यांना आरोपीस लाच रक्कम देण्याची मुळीच ईच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गडचिरोली येथील अधिकाऱ्यांना भेटुन तकार नोंदविली.
पोलीस उपअधिक्षक अनामिका मिर्झापूरे, ला.प्र.वि. गडचिरोली यांचे पर्यवेक्षणात पो.नि. श्रीधर भोसले यांनी तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीची अत्यंत गोपनीयरित्या शहानिशा करून सापळा कारवाईचे आयोजन केले असता, त्यामध्ये पडताळणी दरम्यान तक्रारदार यांस आदिवास ते आदिवासी ला जमीन विक्री करण्याचे परवानगीचे आदेश तयार करून दिल्याचा मोबदला म्हणुन आरोपी नागसेन प्रेमदास वैद्य यांनी रूपये १५ हजार लाच रक्कमेची मागणी केली व तडजोडीअंती १३ हजार रुपये स्विकारतांना उपविभागीय अधिकारी कार्यालय कुरखेडा येथील स्वतःचे कक्षात स्वीकारतांना रंगेहाथ मिळून आल्याने त्यांचेविरूध्द पोस्टे, कुरखेडा येथे गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी नागसेन वैद्य यांचे वडसा येथील निवासस्थानाची ॲन्टी करप्शन ब्यूरो, गडचिरोली चमूकडून झडती घेण्यात आली.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक राहुल माकणीकर, ॲन्टी करप्शन ब्युरो, नागपूर, सचिन कदम अपर पोलीस अधिक्षक, ला.प्र.वि. नागपूर, संजय पुरंदरे अपर पोलीस अधिक्षक, ला.प्र.वि. नागपुर यांचे मार्गदर्शनात व पोलीस उपअधिक्षक अनामिका मिर्झापूरे यांचे पर्यवेक्षणात पो.नि. श्रीधर भोसले, पोहवा शंकर डांगे, राजेश पदमगिरीवार, पो.अं. संदीप उडान, संदिप घोरमोडे व चापोना प्रफुल डोर्लीकर, सर्व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गडचिरोली यांनी केलेली आहे.
