– एका अंमलदार गुणवत्तापुर्ण सेवेसाठी पदक जाहीर
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : देशभरामध्ये पोलीस दलात किंवा इतर सशस्त्र दलात उत्कृष्ट व शौर्यपुर्ण कामगिरी केलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदारांना प्रजासत्ताक दिनानिमीत्त शासनाकडून सन्मानित केले जाते. यावर्षी सुद्धा २५ जानेवारी २०२४ रोजी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंधेला गडचिरोली पोलीस दलातील १८ पोलीस अधिकारी व अंमलदारांना महामहीम राष्ट्रपती यांचे पोलीस शौर्य पदक व ०१ गुणवत्तापुर्ण सेवासाठी पदक जाहीर झाले आहे. संपूर्ण देशभरात एकुण २७५ पोलीस शौर्य पदक व ७५३ गुणवत्तापुर्ण सेवेसाठी पदक जाहीर झाले असून, त्यापैकी गडचिरोली पोलीस दलास १८ पोलीस शौर्य पदक व ०१ गुणवत्तापुर्ण सेवेसाठी पदक जाहीर झाले आहेत. ही निश्चितच गडचिरोली पोलीस दलासाठी अभिमानास्पद कामगिरी आहे. तसेच सन २०२३ या वर्षामध्ये ६२ पोलीस अधिकारी व अंमलदार यांना राष्ट्रपती यांचे पोलीस शौर्य पदक प्राप्त झाले होते. सन २०२४ मध्ये एकुण १९ पोलीस अधिकारी/अंमलदार यांना राष्ट्रपती यांचे पोलीस शौर्य पदक व गुणवत्तापुर्ण सेवेसाठी पदक प्राप्त झाले आहे.
पोलीस शौर्य पदक प्राप्त अधिकारी व अंमलदारांची नावे : सोमय विनायक मुंढे, भा.पो.से. पोलीस अधीक्षक लातुर, संकेत सतीश गोसावी उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग करवीर जि. कोल्हापुर, पोहवा/३०७८ मोहन लच्छु उसेंडी, पोहवा/८७३ देवेंद्र पुरोषत्तम आत्राम (2ND BAR to PMG,), पोहवा/२७३४ जीवन बुधाजी नरोटे, पोहवा/२६१२ माधव कोरके मडावी, पोहवा/२४७४ संजय वत्ते वाचामी (1ST BAR to PMG,) पोहवा/३०२९ मुंशी मासा मडावी पोहवा/३०४७ गुरुदेव महारुराम धुर्वे, पोनाअं/३७२९ कमलेश निखेल नैताम, पोनाअं/३७४३ शंकर पोचम बाचलवार, पोनाअं/३०२६ विनोद मोतीराम मडावी, पोनाअं/४१३६ दुर्गेश देविदास मेश्राम, पोअं/३७१८ विजय बाबुराव वडेट्टीवार, पोअं/५४८८ कैलाश श्रवण गेडाम, पोअं/४४९७ हिराजी पिताबंर नेवारे, पोअं/५६९७ ज्योतीराम बापु वेलादी, पोअं/११५६ सुरज देवीदास चुधरी यांना पदक मिळाले असुन सहा.फौ/३२४८ देवाजी कोट्टु कोवासे यांना गुणवत्तापुर्ण सेवेसाठी पदक जाहीर झाले आहे.
वरील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेल्या उल्लेखनिय व वैशिष्टयपुर्ण कामगिरीची दखल घेऊन राष्ट्रपती यांचे पोलीस शौर्य व गुणवत्तापुर्ण सेवेसाठी पदक जाहीर झाले असुन, त्याबद्दल प्रभारी पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख व अपर पोलीस अधीक्षक अहेरी (प्राणहिता) एम. रमेश या सर्वांनी त्यांचे कौतुक केले आहे व त्यांच्या पुढील सेवेकरीता शुभेच्छा दिल्या आहेत.
