विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा (Wardha) : होमगार्डची पदे भरण्यासाठी २३ ऑगस्ट पासून सकाळी ७ वाजता पोलिस मुख्यालय येथे होमगार्ड नोंदणीचे आयोजन करण्यात आले आहे. वर्धा जिल्हा होमगार्ड मधील रिक्त असलेल्या रिक्त पदसंख्येत वाढ झाली असून एकूण १२७ पुरुष होमगार्डची पदे भरण्यात येणार आहे. त्यामध्ये वर्धा पथकातील ८६ रिक्त पदे, आर्वी पथकातील ३७, हिंगणघाट पथकातील ४ रिक्त पदांचा समावेश आहे.
होमगार्ड नोंदणीचे ऑनलाईन अर्ज, माहितीपत्रक, नियम व अटी याबाबत सविस्तर माहिती https://maharashtracdhg.gov.in/mahahg/login1.php या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. नोंदणी दिनांकापर्यंत रिक्त जागेचा अनुशेष वाढल्यास नाव नोंदणी मधुन अनुशेष पुर्ण केला जाईल, असे जिल्हा समादेशक होमगार्ड तथा अपर पोलिस अधिक्षक डॉ. सागर कवडे यांनी कळविले आहे.
