Latest Posts

मिशन लक्षवेध अंतर्गत खेळाडूंची (टेबल टेनिस व मैदानी) निवड चाचणी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli): क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे मार्फत मिशन लक्षवेध योजना ही धोरणात्मक योजना राबविण्यात येत आहे. सदर योजनेअंतर्गत थलेटिक्स, टेबल टेनिस, बॅडमिंटन व बॉक्सिंग या खेळांचे विभागीय क्रीडा निपुणता केंद्र उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, नागपूर विभाग, नागपूर येथे स्थापन करण्यात येणार असुन तुर्तस टेबल टेनिस आणि ॲथलेटिक्स या क्रीडा प्रकाराची खेळाडू निवड चाचणी प्रस्तावित आहे.

सदर निवड चाचणीचे प्रभावी आयोजन करण्याच्या अनुषंगाने खेळाडूकरिता गुगल फार्म लिंक https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfClRXqvKpyEWTVbUce6OqJeiSxQiA
J1O4QVMdbwE5qsMgNRw/viewform?usp=publish-editor उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

गुगल फॉर्म मध्ये खेळाडूंनी सर्व माहिती अचुकपणे भरणे अभिप्रेत असुन १५ मार्च २०२६ रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत सादर करणे बंधनकारक आहे.
मिशन लक्षवेध योजना अंतर्गत उपसंचालक क्रीडा व युवक सेवा, नागपूर विभाग, नागपूर येथे विभागीय क्रीडा निपुणता केंद्र अंतर्गत स्थापित होणाऱ्या प्रशिक्षण केंद्राकरिता खेळाडू निवड निकष खालीलप्रमाणे.
१)ॲथलेटिक्स
१) वयोमर्यादा – २५ वर्षाआतील मुले/मुली (त्या वर्षाच्या ३१ डिसेंबर रोजी)
२) आवश्यक कागदपत्रे – जन्मदाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, आधार कार्ड,
गत २ वर्षातील क्रीडा विषयक कामगिरीचे प्रमाणपत्र, पासपोर्ट साईज फोटोग्राफ, शाळा /
महाविद्यालय बोनाफाईट प्रमाणपत्र, पालकाचे संमती पत्र इ.
३) अधिवास – महाराष्ट्र राज्यातील खेळाडू असला पाहिजे.
४) क्रीडा कामगिरी – राज्यातील खेळाडू किंवा राष्ट्रीयस्तरावरील सहभागी खेळाडू (SGFI, AFI,
KHELO INDIA NATIONAL ONLY) गत २ वर्षाच्या क्रीडा कामगिरीचे मुल्यमापन करण्यात
येऊन क्रीडा कौशल्य व तंदुरुस्ती (FITNESS) चाचण्यांमध्ये पात्र होणे आवश्यक

५) वैद्यकीय चाचणी – शासन मान्यताप्राप्त डॉक्टराकडून दिलेले वैद्य वैयक्तीक फिटनेस प्रमाणपत्र
अनिवार्य.
२. टेबल टेनिस :
१) वयोमर्यादा – २ वर्षाआतील मुले/मुली (त्या वर्षाच्या ३१ डिसेंबर रोजी)
२) आवश्यक कागदपत्रे – जन्मदाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, आधार कार्ड,
गत २ वर्षातील क्रीडा विषयक कामगिरीचे प्रमाणपत्र, पासपोर्ट साईज फोटोग्राफ, शाळा /
महाविद्यालय बोनाफाईट प्रमाणपत्र, पालकाचे संमती पत्र इ.
३) अधिवास महाराष्ट्र राज्यातील खेळाडू असला पाहिजे.
४) क्रीडा कामगिरी – राज्यातील खेळाडू किंवा राष्ट्रीयस्तरावरील सहभागी खेळाडू (SGFI, AFI,
KHELO INDIA NATIONAL ONLY) गत २वर्षाच्या क्रीडा कामगिरीचे मुल्यमापन करण्यात
येऊन क्रीडा कौशल्य व तंदुरुस्ती (FITNESS) चाचण्यांमध्ये पात्र होणे आवश्यक
५) वैद्यकीय चाचणी – शासन मान्यताप्राप्त डॉक्टराकडून दिलेले वैद्य वैयक्तीक फिटनेस प्रमाणपत्र
अनिवार्य.

उपरोक्त आयोजीत होणाऱ्या निवड चाचणीकरीता गडचिरोली जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थी /
खेळाडूंनी सहभागी होऊन विभागीय क्रीडा निपुनता केंद्रात आपला प्रवेश निश्चित करावा असे आवाहन भास्कर
घटाळे, जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.

Latest Posts

Don't Miss