Latest Posts

राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार-२०२५ साठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा (Bhandara) : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. त्याप्रमाणे यावर्षीही करण्यात आलेले आहे. जिल्ह्यातील पत्रकारांना यानिमित्ताने पुरस्कारासाठी ची नामांकन देण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

या स्पर्धेसाठी १ जानेवारी, २०२५ ते ३१ डिसेंबर, २०२५ पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यांच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका पाठविण्याचा अंतिम १५ मार्च, २०२६ असा आहे.

जिल्ह्यातील पत्रकारांना आवाहन करण्यात येते, राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार-२०२५ साठी जिल्हा माहिती कार्यालयाकडून, विहित नमुन्यातील अर्ज सादर करावा. अर्जाचे नमुने dgipr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

Latest Posts

Don't Miss