Latest Posts

 शबरी आदिवासी विभागाद्वारे कर्ज योजनेसाठी ऑनलाइन अर्ज उपलब्ध

– जिल्हयातील इच्छुक लाभार्थानी या योजनेचा लाभ घ्यावा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा (Bhandara): शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्या. शाखा कार्यालय देवरी अंतर्गत महामंडळ मार्फत सन २०२४-२०२५ करिता आदिवासी बांधवा साठी एन.एस.टी.एफ.डी.सी.नवी दिल्ली पुरस्कृत व राज्य शासन पुरस्कृत नवी दिल्लीच्या धर्तीवर स्वयमरोजगाराच्या योजना राबविण्यात येत आहे. मुख्य कार्यालय नाशिक मार्फत राबविण्यात येणाऱ्या कर्ज योजने करीता गोंदिया व भंडारा जिल्हयाकरीता लक्षांक प्राप्त झाला आहे.

या कर्ज योजनेत महामंडळाचा ९०% सहभाग तर लाभार्थाचा १०% सहभाग राहणार आहे या योजनेसाठी विहीत नमुन्यातील अर्ज शबरी महामंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

https://www.mahashabari.in या संकेतस्थळावर ९ ऑगस्ट ते १५ सप्टेबर, २०२४ पर्यंत ऑनलाइन फॉर्म भरावा. गोंदिया व भंडारा जिल्हयातील इच्छुक लाभार्थानी या योजनेचा लाभ घेण्यांचे आवाहन आवाहन शाखा व्यवस्थापक शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ नाशिक शाखा कार्यालय देवरी ता. देवरी जि. गोंदिया यांनी केले आहे.

या कर्ज योजनेतून : १) महिला सशक्तीकरण योजना (रु. २ लक्ष) ०६, २) कृषी आणि संलग्न व्यवसाय (रु.५ लक्ष) ०२, ३) हॉटेल ढाबा व्यवसास (रु.५ लक्ष) ०२, ४) स्पेअर पार्ट/ गॅरेज/ ऑटो वर्कशॉप (रु.५ लक्ष) ०२, ५) वाहन व्यवसाय (रु.१० लक्ष) ०१, ६) वाहन व्यवसाय (रु.१० लक्षपेक्षा जास्त व रु.१५ लक्ष पर्यत ०२, ७) लघु उघोग व्यवसाय (रु ०३ लक्ष) ०२, ८) ऑटो रिक्षा/ मालवाहू रिक्षा (रु.३ लक्ष) ०२, ९) स्वयंसहायता बचत गट योजना (रु ५ लक्ष) ०२ एकुण २१ लक्षांक प्राप्त झाला असुन उद्यिष्टाच्या प्रमाणात अंतिम मंजुरीसाठी सादर करावयाचे आहे.

सदर कर्जयोजनेसाठी व्यवसायाचे ऑनलाइन प्रस्ताव सादर करतांना जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड, बँक पासबुक, ड्राईव्हीग लॉयसन्स (वाहन करीता), इत्यादी कागदपत्रे सोबत जोडणे आवश्यक आहे. त्याशिवाय अर्ज स्वीकारला जाणार नाही, असे शाखा व्यवस्थापक शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्या. शाखा कार्यालय देवरी यांनी प्रसिध्दीद्वारे कळविले आहे. सविस्तर लक्षांक व कर्जयोजनांसाठी पात्रता, अटी कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर लावलेले आहेत.

Latest Posts

Don't Miss