विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli): नोकरी शोधणारे व नोकरी देणारे यांना एकाच व्यासपीठावर आणून बेरोजगार उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे तसेच नियोक्ता / उद्योजकांना कुशल मुनष्यबळ उपलब्ध करून देण्याच्या उददेशाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली, यांच्या वतीने २६ मे २०२६ रोजी वेळ स.१०.वाजल्या पासून ते ४ वाजेपर्यंत शिवाजी हायस्कुल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज, नविन बस स्टॅण्ड जवळ गडचिरोली रोड, चामोर्शी येथे पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यांत आले आहे.
सदर रोजगार मेळाव्यामध्ये वरील या नामांकित खाजगी कंपन्या सहभागी होणार असून वरील विविध पदांसाठी एकुण ४३४ रिक्त जागांसह उपस्थित राहणार आहेत. एकुण १० पदांसाठी कमाल वय १८ ते किमान ५० वयोगटातील १० वी १२ वी पास / नापास , आयटीआय पास ,डिप्लोमा, पदवीधर , पदव्युत्तर उत्तीर्ण / अनुत्तीर्ण सर्व बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यांत येणार आहे. संबंधित पदांसाठी किमान वेतन रू.१६ हजार ते कमाल रू.५० हजार पर्यंत देण्यांत येणार असून सर्व बेरोजगार उमेदवारांनी या रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा.
गडचिरोली जिल्हयातील सर्व बेरोजगार उमेदवारांनी वरील पदांसाठी आयोजित रोजगार मेळाव्यामध्ये प्रत्यक्ष सहभागी होऊन मुलाखती द्याव्यात व पात्र उमेदवारांनी रोजगाराची संधी प्राप्त करून घ्यावीत. त्याकरीता मंगळवार २६ मे २०२६रोजी स.१० वाजल्यापासून शिवाजी हायस्कुल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज, नविन बस स्टॅण्ड जवळ गडचिरोली रोड, चामोर्शीयेथे आयोजित पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यामध्ये उमेदवारांनी आपल्या बायोडेटा /रिज्युम व सर्व आवश्यक कागदपत्रासोबत प्रत्यक्ष उपस्थित राहून रोजगार मेळाव्याच्या संधीचा लाभ घ्यावा. अधिक माहिती व संपर्काकरीता या कार्यालयाच्या gadchirolirojgar@gmail.com वर व ७८४३०४८२4९ / ८७८८२५७०१६ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली यांनी केली आहे.
