Latest Posts

मालवाहकाच्या धडकेत मोटारसायकलस्वार गंभीर जखमी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया (Gondia) : ग्रामीण पोलिस ठाण्यापासून काही अंतरावर, पोलिस अधीक्षक कार्यालयाजवळील सिमेंट रस्त्यावर गुरुवारी (२०) दुपारी सुमारे दोनच्या सुमारास झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार युवक गंभीर जखमी झाला. मालवाहक वाहनाच्या बेदरकार धडकेमुळे हा अपघात घडल्याची माहिती मिळाली आहे.

फिर्यादी चंद्रशेखर सुरजलाल बावनथडे (४५, रा. कटंगटोला-खमारी) यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, टाटा मालवाहक (क्रमांक एमएम ३५- एजे ४३९६) च्या चालकाने वाहन वेगाने, निष्काळजीपणे व नियमनाचा विचार न करता चालविले. यामुळे अनिल सुरजलाल बावनथडे (४८) यांच्या मोटारसायकलला (क्रमांक एमएच ३५- एपी ७२५४) जोरदार धडक देण्यात आली.

या धडकेत अनिल बावनथडे यांच्या डोक्याच्या मागील भागाला व उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, ग्रामीण पोलिसांनी मालवाहक चालकाविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम २७९, ३३७ तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

Latest Posts

Don't Miss