Latest Posts

महाडीबीटी पोर्टलवर शिष्यवृत्ती योजनेसाठी ऑनलाईन अर्ज ३० जून पर्यत अंतिम संधी

– विद्यार्थ्यांनी महाविाद्यालयाचे प्राचार्याशी संपर्क साधावा.

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा (Bhandara) : सद्यस्थितीत शैक्षणिक वर्ष २०२३-२४ या वर्षाकरिता महाडीबीटी पोर्टलवर शिष्यवृत्ती योजनेसाठी ऑनलाईन अर्ज दाखल करणे सुरू आहे. तथापि, अर्ज स्वीकृती मॉडयूमध्ये महाडीबीटी प्रणालीवर विद्यार्थ्यांना त्याच्या लॉगीनमध्ये शिष्यवृती अर्ज भरत असतांना राईट टू गिव्ह अपचा टॅब नव्याने प्रथमच उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. ज्याद्वारे शिष्यवृतीचा लाभ कायमस्वरूपी थांबविण्याची किंवा सोडून देण्याची तुमची इच्छा असेल तर राईट टू गीव्ह अप हे कायमस्वरुपी थांबविण्याची किंवा सोडून देण्याची तुमची इच्छा असेल तरच राईट टू गीव्ह अप हे बटन दाबावे असा त्यावर उल्लेख आहे.

सदर सुविधा प्रणालीवर नव्याने प्रथमच उपलब्ध करून दिलेली असल्याने सदर अनेक विद्यायांकडून अनभिज्ञतेतून अथवा नजरचुकीने कनीक झाला होता, पर्यायाने असे विद्यार्थी शिष्यवृत्ती/शिक्षण शुल्क परीक्षा शुल्कापासून वंचित राहत होते.विद्यार्थी, विविध संघटना शासनाचे विविध विभाग याची मागणी विचारात घेता, माहिती व तंत्रज्ञान विभागाने राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर ज्या विद्याथ्यांनी अनावधानाने अथवा नजरचुकीने Right to Give-up हा पर्याय निवडून त्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज रदबातल झाले असतील केवळ अशा विद्यार्थ्यांना त्याचा अर्ज Revert Back करण्याची सुविधा Fevert Right to Give up सदराखाली उपलब्ध करून ३० जून २०२४ पर्यंत अंतिम संधी देण्यात आलेली आहे.

या बाबत विद्यार्थ्याने आपल्या महाविद्यालयाच्या प्राचार्याशी संपर्क साधून महाविद्यालयांच्या प्राचार्य Login मधून आपला अर्ज Revert Back करून घेणे आवश्यक आहे. Revert Back झालेला अर्ज विहित वेळेत विद्यार्थ्यांच्या Login मधून ऑनलाईन फेर सादर करणे आवश्यक राहील.

त्याचबरोबर अशा सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येत आहे कि, त्यांनी उपरोक्त प्रक्रियेचा अवलंब करून त्यांचा अर्ज विहित मुदतीत Revert Back करून घ्यावा व याची संपूर्ण जबाबदारी विद्यार्थ्यांची आहे.

सदरील प्रकरणी कोणतीही अडचण असेल तर संबंधितांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, भंडारा या कार्यालयास त्वरीत संपर्क साधावा. कार्यालयाशी संपर्क साधावा.असे आवाहन श्री. बाबासाहेब देशमुख, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण मंडारा यांनी केले आहे. अधिक माहीतीसाठी व संपर्कासाठी पत्ता-सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, भंडारा,कार्यालयाचा पत्ता: डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जिल्हा परिषद चौक, भंडारा Email id: acswobhandara@gmail.com वर संपर्क साधावा.

Latest Posts

Don't Miss