विदर्भ न्युज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर (Nagpur) : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरतीसाठी पात्र उमेदवारांना कंम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस (सीडीएस)-६४ या परीक्षेची पूर्व तयारी करुन घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतीसाठी १९ जानेवारी २०२६ ते ३ एप्रिल २०२६ या कालावधीत सीडीएस कोर्स क्र. ६४ आयोजित करण्यात येत आहे. प्रशिक्षण कालावधीत प्रशिक्षणार्थींना निःशुल्क प्रशिक्षण, निवास व भोजन दिले जाते.
जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाच्या भरती पूर्व प्रशिक्षणासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, नागपूर येथे १६ जानेवारी २०२६ रोजी मुलाखतीस हजर रहावे.
अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा ईमेल आय. डी. : training.pctenashik@gmail.com व दूरध्वनी क्र. ०२५३-२४५१०३२ किंवा व्हॉट्सअप क्र. ९१५६०७३३०६ असून कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष किंवा दूरध्वनीवरून संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
