Latest Posts

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले व पंडित दीनदयाल उपाध्याय वसतिगृह योजनेतंर्गत प्रवेशासाठी मुदतवाढ

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : शैक्षणिक सत्र २०२५-२०२६ करिता इतर मागास प्रवर्गातील मुला/मुलींसाठी शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यानुसार इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत कार्यरत असलेल्या मुला-मुलींच्या वसतिगृहांमध्ये तसेच आधार व स्वयंम योजनेंतर्गत १२ वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे.

शासनाच्या https://hmas.mahait.org या ऑनलाईन पोर्टलवर शासकीय वसतीगृह असलेल्या जिल्ह्यासाठी पंडित दिनदयाल स्वयंम व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी १२ वी नंतरच्या व्यवसायिक व बिगर व्यवसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या पद‌वी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी १० मार्च २०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज भरून अर्जाची प्रिंट व आवश्यक कागदपत्रे, संबंधीत वसतिगृहास विहीत मुदतीत सादर करावी.

तसेच शासकीय वसतीगृहासाठी पात्र असलेल्या तथापि गुणवत्तेनुसार व वसतीगृहाच्या क्षमतेअभावी वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज पंडित दिनदयाल स्वयंम व ज्ञानज्योती सावित्रीबाई फूले आधार योजनेसाठी विचारात घेतले जातील. शासकीय वसतीगृह उपलब्ध नसलेल्या जिल्ह्यासाठी पंडित दिनदयाल स्वंयम योजना व ज्ञानज्योती सावित्रीबाई फूले आधार योजनांचे अर्ज http://hmas mahait.org या पोर्टलवर भरून ऑनलाईन भरलेला अर्जाची प्रिंट व आवश्यक कागदपत्रे संबंधीत वसतिगृहास विहीत मुदतीत सादर करावी.

अधिक माहितीकरीता इमाव विमाप्र व विजाभज मुला-मुलींचे शासकीय वसतीगृह चंद्रपूर येथील गृहपाल तसेच सहाय्यक संचालक कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. सचिन मडावी यांनी केले आहे.

Latest Posts

Don't Miss