– स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोली व पोलीस उप- मुख्यालय प्राणहिता (अहेरी) यांच्या संयुक्त कार्यवाहित अतिसंवेदनशिल नैनगुंडम गावात अवैध दारुसह एकूण १२ लाख २६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
– पोस्टे अहेरी पथकाने केला वाहनासह एकुण १० लाख ७६ हजार रुपयांचा अवैध दारुचा मुद्देमाल जप्त
– अपर पोलीस अधीक्षक अहेरी (प्राणहिता) पथकाने दोन विविध ठिकाणच्या कार्यवाहीत केला ९ लाख ९३ हजार १७० रुपये किंमतीचा अवैध दारूसाठा जप्त
– चार विविध गुन्ह्यात एकुण ०५ आरोपीतांना घटनास्थळावरुन घेतले ताब्यात
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : गडचिरोली जिल्हा हा दारुबंदी जिल्हा असल्याने येथील दारु तस्करी करणारे ईसम पोलीसांची दिशाभूल करण्याच्या उद्देशाने वारंवार नवीन क्लुप्त्या करीत असतात. माओवाददृष्ट्या अतिसंवेदनशिल गावात दारु माफिया हे गोर गरीब आदिवासी जनतेची दिशाभूल करुन तसेच त्यांना पैशाचे आमिष दाखवून त्यांचे राहते घरात दारुची अवैध साठवणुक करुन ठेवत असल्याचा प्रकार गडचिरोली पोलीस दलाच्या निदर्शनास आल्याने गडचिरोली पोलीस दलाने आक्रमक पवित्रा घेत चार विविध ठिकाणी प्रोव्ही रेड करत वाहनासह अवैध दारुचा एकुण ३३ लाख २२ हजार ९८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
अहेरी तालुक्यातील उपपोस्टे दामरंचा हद्दीतील माओवादवृष्ट्या अतिसंवेदनशिल नैनगुंडम या गावात काल २३ जून २०२४ रोजी दुपारी १५.०० वा. दरम्यान गोपनिय बातमीदारांकडून उपपोरटे रेपनपल्ली हद्दीतील मौजा कमलापुर येथे राहणारा ईसम पुरुषोत्तम हनमलधार याने मौजा नैनगुंडम गावातील आपले साथीदार संतोष भिमा सिहाम व गणेश सालच्या आलाम यांच्या मदतीने संतोष सिडाम याचे राहते घरी अवैधरित्या मोठ्या प्रमाणात देशी दारु व काळ्या गुळाची साठवणुक करुन ठेवली असल्याबाबतची खात्रिशीर माहिती प्राप्त झाली. सदर माहितीवरुन वरिष्ठांच्या आदेशाने व मार्गदर्शनाखाली स्वा.गु.शा. पोलीस पथकाचे दोन टिम च प्राणहीता अहेरी येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांची एक टिम तयार करुन गोपनियरित्या प्रोव्ही रेड कार्यवाही करीता रवाना केले. सदर पोलीस पथकांनी मौजा नैनगुंडम गावातील संतोष सिडाम याचे राहते घरी जावुन प्रोव्ही रेड केली असता, त्याचे घरात देशी दारुच्या १४२ पेट्या किमत ११ लाख ३६ हजार रुपये, काळ्या गुळाच्या ७५ पेट्या- किमत ९० हजार रुपये, असा एकुण १२ लाख २६ हजार रुपयांचा अवैध मुद्देमाल मिळून आल्याने सदरचा मुद्देमाल घटनास्थळावरुन जप्त करण्यात आला. तसेच ईराम संतोष सिडाम व गणेश आलाम यांना ताब्यात घेण्यात आले. सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी पुरुषोत्तम हनमलवार हा कार्यवाहीची चाहुल लागल्याने फरार झाल्याचे आढळून आले. पोलीस पथकाद्वारे त्याचा शोध घेणे सुरु आहे.
यासोबतच चंद्रपूर जिल्ह्यातून पोस्टे अहेरी हद्दीत अवैधरित्या दारु तस्करी होत असल्याबाबच्या गोपनिय माहितीवरुन २३ जून २०२४ रोजी अहेरी पोलीसांनी मौजा बोटलाचेरु गावाजवळ सापळा रचून संशयीत चाहन थांबवून सदरचे वाहन चेक केले असता, त्यात रॉयल स्टँग विदेशी दारुच्या ०६ पेट्या (चिक्री किंमत १ लाख ०८ हजार रु.) रॉकेट संत्रा देशी दारुच्या ०४ पेट्या चिक्री किंमत ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. वाहन चालक मोहम्मद इलीयास शेख रा. बालाजी वार्ड चंद्रपूर यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, त्याने किशोर सुर्यभान डांगरे रा. आलापल्ली यास दारुचा पुरवठा करित असल्याचे सांगितले. आरोपिंकडून देशी विदेशी दारु, मोबाईल व टाटा व्हीस्टा चाहन क्र. एच एच ३३ ए ३७९३ वाहनासह एकूण ४ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन दोन्ही आरोपीविरुद्ध दारुबंदी कायद्यांन्यये पोस्ट अहेरी येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
तसेच २४ जून २०२४ च्या रात्री पोस्टे अहेरी येथील पोलीस पथक नाईट गस्त ड्युटी करित असतांना रस्त्याच्या कडेला थांबलेल्या एका संशयित महिंद्रा पिकअप वाहन क्र. एम एच ३८ एक्स ३०५५ वाहनाजवळ जाऊन विचारपूस केली असता, वाहनातील चालक हा पोलीसांना पाहून पळून गेला. त्यानंतर सदर वाहनाची तपासणी केली असता त्यात रॉकेट संत्रा देशी दारुच्या ६८ पेट्या विक्री किंमत ४ लाख ७६ हजार रु. मिळून आल्याने वाहनासह एकूण १० लाख ७६ हजार रु. किमतीचा मुद्देमाल जप्त करुन अज्ञात वाहन चालकाविरुद्ध पोस्टे अहेरी येथे दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
तसेच २४ जून २०२४ रोजी गोपनिय बातमिदाराकडून उपपोस्टे रेपनपल्ली हद्दीतील मौजा लिंगमपल्ली गावाजवळील लिंगमपल्ली टोला येथे अवैध दारु विक्री होत असल्याबाबतच्या मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारावर अपर पोलीस अधीक्षक अहेरी (प्राणहिता) पोलीस पथकाने सदर ठिकाणी छापा टाकला असता, १) गंगाराम बकय्या नेरला २) नागेश सोमा नेरला दोघेही रा. लिंगमपल्ली तह. अहेरी हे अवैध दारू विक्री करित असतांना मिळून आल्याने त्यांच्या ताब्यातून आयएमएफएल (IMFL) विदेशी दारुचे ३८ बॉक्स व देशी दारुच्या २० पेठ्या असे एकुण ५८ बॉक्स अंदाजे किंमत ५ लाख ८३ हजार १७० रुपयांचा अवैध मुद्देमाल जप्त करण्यात आला व दोन्ही आरोपीस ताब्यात घेण्यात आले. अशा चार विविध ठिकाणी प्रोव्ही रेड करत गडचिरोली पोलीस दलाने वाहनासह अवैध दारुचा एकुण ३३ लाख २२ हजार ९८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
सदरच्या विविध कारवाया पोलीस अधीक्षक गडचिरोली नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिता, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक अहेरी एम. रमेश यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी अहेरी अजय कोकाटे, पोनि, स्थागुशा, उल्हास भुसारी, पोस्टे अहेरी प्रभारी अधिकारी पोनि, दशरथ वाघमोडे, सपोनि. राहुन आव्हाड, पोउपनि. राजू गवळी, पोउपनि. विजय सपकाळ, मपोउपनि. सरीता मरकाम, मपोउपनि. करुणा मोरे, परिपोउपनि. संकेत सानप व त्यांच्या पथकातील पोलीस जवानांनी केलेली आहे.
