विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई (Mumbai) : अनेकजण ऑनलाइन फूड डिलेव्हरी अॅप्लिकेशनवरुन पदार्थ मागवतात. घरबसल्या मोबाईलवरुन हव्या त्या हॉटेल, रेस्तराँमधून पदार्थ मागवून आस्वाद घेणारे आपल्यापैकी अनेकजण आहेत.
मात्र असाच एक मोह मुंबईमधील मालाड येथील डॉक्टरला फारच महागत पडला. घडलेला हा प्रकार समजल्यानंतर ऑनलाइन माध्यमातून पदार्थ मागवताना अनेकदा विचार कराल.
मालाडमध्ये राहणाऱ्या ऑर्लेम ब्रेडन सेराओ या २७ वर्षीय डॉक्टरने बुधवारी एका फूड डिलेव्हरी अॅपवरुन आईस्क्रीम मागवली. ऑर्लेम यांनी मागवलेला आईस्क्रीमचा कोन आल्यानंतर त्यांनी कव्हर उघडून तो खाण्यास सुरुवात केली. मात्र काही क्षणात त्यांना त्या आईस्क्रीमच्या कोनात तुटले हाताचे बोट सापडले. हे बोट दोन सेंटीमीटर लांब होते.
माहितीनुसार, ज्या व्यक्तीला आईस्क्रीमच्या कोनमध्ये हे बोट सापडले आहे ती व्यक्ती पेशाने डॉक्टर आहे. या व्यक्तीने एमबीबीएसपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. या व्यक्तीच्या बहिणीने घरातील किराणा मालाचे सामान ऑनलाइन मागवले तेव्हाच या आईस्क्रीम कोनची ऑर्डर देण्यात आली होती. आता या प्रकरणाची दखल मालाड पोलिसांनी घेतली असून तपास सुरु केला आहे.
