Latest Posts

महाज्योती तर्फे मोफत MPSC स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण

– OBC, VJNT व SBC विद्यार्थ्यांकरिता सुवर्ण संधी

– संकेतस्थळावर अर्ज प्रक्रियेला सुरुवात

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर (Nagpur) : महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर या स्वायत्त संस्थेमार्फत राज्यातील इतर मागास वर्ग (ओबीसी), विमुक्त जाती-भटक्या जमाती (व्हीजेएनटी) व विशेष मागास प्रवर्गातील (एस.बी.सी) विद्यार्थ्यांसाठी मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण राबविण्यात येते.

सन २०२४-२५ या वर्षातील महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) संयुक्त गट ब व क स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणासाठी महाज्योतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया २७ जून २०२४ रोजी पासून सुरु केलेली आहे. सदरचे अर्ज महाज्योतीच्या www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर मागविण्यात आले आहेत. महाज्योतीमार्फत महाराष्ट्र लोकसेवा आयोग संयुक्त गट ब व क परीक्षा पूर्व प्रशिक्षण या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. प्रशिक्षणाबाबतचे सर्व तपशील, निकष, अटी व शर्ती तसेच अर्ज करण्याची सविस्तर प्रक्रिया याबाबतची माहिती www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या इच्छुक विद्यार्थ्यांनी या सुवर्ण संधीचा लाभ घेण्याचे आवाहन महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

महाज्योतीमार्फत प्रशिक्षणात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येक महिन्यात विद्यावेतन देखील देण्यात येणार असुन प्रशिक्षणासाठी रुजु होताना एकरक्कमी आकस्मिक निधी देखील देण्यात येणार आहे. सदरचे प्रशिक्षण हे नामांकित प्रशिक्षण संस्थांमार्फत देण्यात येणार असून प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांची निवड ही प्रवेश परीक्षा घेऊन करण्यात येणार आहे, असल्याचेही महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांनी सांगितले. महाज्योतीचे मोफत एमपीएससी संयुक्त गट ब व क प्रशिक्षण घेण्यासाठी राज्यातील इतर मागास वर्ग (ओबीसी), विमुक्त जाती भटक्या जमाती (व्हीजेएनटी) व विशेष मागास प्रवर्ग (एसबीसी) प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर विहित कालावधीत अर्ज करण्याचे आवाहन महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले, यांनी केलेले आहे. अधिक माहितीसाठी ०७१२- २८७०१२०/१२१ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहनही महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांनी केले.

Latest Posts

Don't Miss