विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर (Nagpur) : केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय अंतर्गत दिव्यांगजन सशक्तीकरणाच्या विभागाच्या संकेतस्थळावर दिव्यांग व्यक्तींकरीता राष्ट्रीय पुरस्कार सन २०२४ करीता ऑनलाईन माध्यमातुन अर्ज, नामांकन मागविण्यात आले आहे.
अर्ज ३१ जुलै पर्यंत http://www.awards.gov.in या संकेतस्थळावर आँनलाईन स्वीकारण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी किशोर भोयर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
