विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा (Wardha) : महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत तयार करण्यात आलेल्या बाल धोरण व कृती आराखड्या संदर्भात ३० जून २०२४ रोजी सायंकाळ ६.१५ वाजेपर्यंत नागरिकांकडून हरकती व सूचना करण्याचे आवाहन जिल्हा माहिती व बाल विकास अधिकारी यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्य बाल धोरण व कृती आराखडा २०२२ मध्ये आवश्यक बाबी, सूचना, सुधारणा तसेच मराठी भाषेमध्ये भाषांतर करण्यात आलेल्या मसूद्याची शब्दरचना, व्याकरण याबाबत नागरिकांकडून हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत. महिला व बाल विकास आयुक्तांलय, २८ राणीचा बाग, जून्या सर्किट हाऊस जवळ, पुणे ०१ या पत्यावर अथवा childpolicy@gmail.com या ई-मेल वर हरकती व सूचना पाठविण्यात यावे.
बाल धोरणाचा प्रारुप मसूदा तयार करण्यासाठी तज्ज्ञ व्यक्ती व शासनाचे अधिकारी यांचा समावेश असलेली समिती गठीत करण्यात आली होती. या समितीने महाराष्ट्र राज्य बाल धोरण व कृती आराखडा २०२२ तयार केला आहे. हा प्रस्तावित बाल धोरण व कृती आराखडा इंग्रजी व मराठी भाषेमध्ये राज्यशासनाने https://womenchild.maharashtra.gov.in व https://www.wcdcommpune.com या संकेतसस्थळावर प्रसिध्द केला आहे.
