विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा (Bhandara) : ग्राम विकास विभागांतर्गत जिल्हा परिषद भंडारा मधील गट-क संवर्गाची पदभरती २०२३ अंतर्गत अंगणवाडी पर्यवेक्षिका व स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदांची एकत्रित गुणानुक्रमे यादी (Combined List), आय.बी.पी.एस. कंपनीच्या वॉटरमार्क (Watermark) सह जिल्हा परिषद भंडाराचे अधिकृत संकेतस्थळ http://www.bhandarazp.org वर ५ जून, २०२४ रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे.
उपरोक्त अंगणवाडी पर्यवेक्षिका व स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या दोन्ही पदांकरिता गुणानुक्रमे पात्र उमेदवारांची दस्तऐवज पडताळणी १४ जून २०२४ रोजी (शुक्रवारला) करण्यात येणार असुन संबंधित उमेदवारांना ई-मेल व भ्रमणध्वनीद्वारे स्वतंत्ररित्या अवगत करण्यात येईल. असे सदस्य सचिव, जिल्हा निवड समिती तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.) जिल्हा परिषद, भंडारा यांनी कळवले आहे.
