– प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, गडचिरोली विकास एस. कुलकर्णी यांचा न्यायनिर्णय
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : यातील फिर्यादी देवराव कानु कुमरे (५०) रा. पावीमुरांडा यांचा भाऊ दिलीप कुमरे हा त्याची पत्नी बारुबाई व मुलगा समिर पाचेसोबत राहत होते. २० ऑगस्ट २०२२ रोजी आरोपी समीर दिलीप कुमरे हा बांधकाम मजुरीच्या कामासाठी घोटजवळील मौजा मंजेगांव येथे गेला होता.
२१ ऑगस्ट २०२२ रोजी फिर्यादीचा भाऊ दिलीप याची तब्येत बरी नसल्याने तो उपचारासाठी गडचिरोली येथे जावून उपचार घेवून घरी परत आला तेव्हा तो दारु पिलेला होता. तो घरी आल्यानंतर काही वेळाने त्याने त्याची पत्नी आरोपी बारुबाई हिचेसोचत भांडण करुन तिला लाथा- बुक्यांनी मारहाण केली. त्यामुळे त्याची पत्नी बारुबाई हिने तिचा मुलगा समिर याला फोनवरुन तुझ्या वडीलाने मला मारहाण केली अशी माहिती दिल्याने समिर हा २२ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ०७:०० वा. घोटवरुन एसीटी बसने घरी आला. त्यानंतर फिर्यादी बँकेचे कामानिमित्य मौजा तळोधी येथे निघुन गेला. बँकेचे काम आटोपून फिर्यादी गावी दुपारी ०४:०० वा. घरी परत आले, तेव्हा फिर्यादीचे भाऊ दिलीप यांचे घराशेजारी राहणारे ईसम किसन पत्रु उईके, संपत जयराम पैदाम व जिवन उष्टु पेंदोर यांनी फिर्यादीला सांगितले की, तुझा पुतण्या समिर व भाऊसुन बारुबाई यांनी तुझा भाऊ दिलीप कानू कुमरे (४५) याचेशी दुपारी ०१:०० वा. दरम्यान भांडण करून त्याला लाकडी दांड्याने जबर मारहाण केली. अशी माहिती मिळाल्याने फिर्यादीच्या रिपोर्टवरुन पोलीस स्टेशन चामोशी येथे अप. क्र. २५९/२०२२, कलम ३०२, ३४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचे तपासात आरोपी समिर दिलीप कुमारे (२१) यास गुन्ह्यात वापरण्यात आलेले बांबुचे लाकडी दांड्याबाबत विचारपूस केली असता, आरोपीने दोन पंचासमक्ष ज्या बांबूच्या लाकडी दांड्याने मृतकाला हातापायावर व डोक्यावर मारुन ठार केले. तो बांबुचा लाकडी दांडा घटनेचे दिवशी चुलीमध्ये टाकून जाळून टाकला व त्याची तयार झालेली राख बैलाचे गोठ्यात फेकुन दिली. त्यामुळे गुन्यात कलम २०१ वाढ करण्यात आली. तसेच न्यावैद्यकिय प्रयोग शाळेचा अहवाल व इतर पुराचे सरकारी पक्षाने न्यायालयात सादर केले त्यावरुन सेशन क्रमांक १०३/२०२२ नुसार खटला न्यायालयात दर्ज करण्यात आला. विद्यमान प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश गडचिरोली विकास एस. कुलकर्णी यांनी सर्व बाबींचा व सरकारी पक्षाने सादर केलेला पुराया योग्य व न्यायोचित ग्राह्य धरुन काल २५ जून २०२४ रोजी आरोपी क्र. १) समिर दिलीप कुमरे (२१) व आरोपी क्र. २) बारुबाई ऊर्फ अनिता दिलीप कुमरे (४०) दोघेही रा. पावीमुरांडा तह. चामोर्शी जि. गडचिरोली यांना कलम ३०२ भादंवि अन्वये दोषी ग्राह्य धरून जन्मठेप व प्रत्येकी २ हजार रु. द्रव्यदंडाची शिक्षा ठोठावली. तसेच २ हजार द्रव्यदंड न भरल्यास ०३ वर्षे वाढीव शिक्षा तसेच आरोपींना कलम २०१ भादंवि मध्ये दोषी ग्राह्य धरुन ०३ वर्षाची शिक्षा व प्रत्येकी १ हजार रुपये द्रव्यदंडाची शिक्षा ठोठावली.
सरकार तर्फे जिल्हा सरकारी वकील एस.यु. कुंभारे यांनी कामकाज पाहिले, तसेच गुन्ह्याचा तपास पोनि. बिपीन शेवाळे पोस्टे चामोर्शी यांनी केला. तसेच संबंधीत प्रकरणात साक्षदारांशी समन्यय साधुन प्रकरणाची निर्गती करीता कोर्ट पैरवी अधिकारी व कर्मचारी यांनी कामकाज पाहिले.
